शुन्यातून उंच भरारी मारणाऱ्या संतोष लांजेवार ची यशोगाथा

यशकथा/शुन्यातून उंच भरारी मारणाऱ्या संतोष लांजेवार ची यशोगाथा

नगर परिषद दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी

उपजीविका अभियानाचा यशस्वी उपक्रम

शिवाजी वार्ड, शुक्रवारी भंडारा येथील रहिवासी कृष्णा लांजेवार कुटुंब. घरात अठरासे विस दारिद्रय. घराचे छत फाटलेले, वडिलोपार्जित शेती नाही. घरात आई- पत्नी, दोन मुले व एक मुलगी, कुंटुबांचे पालन पोषण करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पेलवने अशक्य होते. तरी सुध्दा नगर परिषदेच्या दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY- NULM) अंतर्गत रोशनी महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करण्याकरिता मालती लांजेवार या महिलेला २५% अनुदानासह दोन लाखांचे अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले. त्यातुन मिरची कांडप मशीन घेऊन उद्योगाला सुरूवात केली.

सुखी संसाराचे स्वप्न रंगवित असतांना मुलांना योग्य शिक्षण देऊन संस्कारमय आदर्श नागरिक घडविणे हा होता. कारण मुले हीच संपत्ती आहे. आणि व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळाले. मुला-मुलींचे लग्न केले. गरिबीतून पुढे येत संपुर्ण कर्जाची परतफेड केली.

उद्योग धंद्याला योग्य चालना व गरिबीतुन सक्षम करण्याकरिता भंडारा नगर परिषदेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. मालती लांजेवार यांनी कर्जाची परतफेड केल्यावर मुलगा संतोष लांजेवार याला पुन्हा दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान स्वयंरोजगार कार्यक्रमांतर्गत विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमार्फत १ लक्ष ८० हजार रुपये अर्थसाहाय्य वितरण करण्यात आले. त्यातून पुन्हा हळद व आटा चक्की खरेदी केली. त्यामाध्यमातून सुरू असलेल्या व्यवसायात पुन्हा भर पडली. पाहता -पाहता मालती आटा चक्की प्रकाश झोतात येऊन यशाचे शिखर गाठायला सुरूवात झाली. दरदिवशी त्यांना ४०० ते ५०० रुपये लाभ मिळत होता. घरात आलेल्या नविन सुनेला व्यवसायाविषयी माहिती दिली. नंतर शितल संतोष लांजेवार ही सुध्दा अविष्कार महिला बचत गटाची सक्रिय सभासद झाली.

या दरम्यान दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत अविष्कार महिला बचत गटातील महिलांना विविध गृह उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाला प्रोत्साहित होऊन उत्पन्न वाढविण्याकरिता त्यांच्या पत्नी शितल संतोष लांजेवर यांनी अविष्कार महिला बचत गटाला बंकेमार्फत प्रथम १२५ हजार रूपये व द्वितीय २५० हजार रूपये कर्ज प्राप्त झाले होते. शितल संतोष लांजेवर यांनी बचत गटामधून कर्ज घेऊन व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने मिरची कांडप व हळद, मसाला व पापड, सेवया, कुरुड्या तयार करण्याकरिता मशीन खरेदी केली. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला नवी चालना मिळाली.

कोरोनाच्या काळात गहू खरेदी करून पिसाईच्या माध्यमातून आटयाची विक्री करत असतांनी आट्याला मोठी मागणी होती. नागरिकांना गहू पिसाई करून आटा पॅकेट विक्री व गहू स्वच्छ (फिल्टर) करण्याची सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकते. त्यांनी ठोक भावामध्ये गहू खरेदी करून स्वताच्या आटाचक्की मध्ये आटा तयार करून शहरातील व शहारच्या बाहेरील हॉटेल, किराणा दुकानामध्ये जाऊन विकायचे, यामधून त्यांना महिन्याला ३० ते ४० हजार रुपयांचा नफा होत असे. या व्यवसायमध्ये त्यांना चांगलाच अनुभव आला. त्यांचा या कामाची दखल दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत घेण्यात आली. त्यांना व्यवसाय वाढविण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले.

त्यानंतर ऑटोमॅटिक आटा मिल सुरू करण्याकरिता मशीनरी व साहित्य खरेदी करिता संतोष लांजेवार लाभार्थीने भंडारा नगर परिषद येथे कर्ज सुविधा उपलब्ध तेबाबत माहिती घेतली. नगर परिषद भंडारा येथील शहर प्रकल्प व्यवस्थापक प्रविण पडोळे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत माहिती दिली. व त्यानुसार DRP यांनी PMFME या योजने अंतर्गत ग्रीशा फूड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून फ्लोअर मिल गव्हाचे पीठ, गहू फिल्टर (स्वच्छ) करून विक्री करण्याचे कर्ज प्रस्ताव तयार करून भंडारा येथील यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा बँक व्यवस्थापक राहुल चेटूले यांनी यूनियन बँकेकडून ३३. ९० लक्ष कर्ज मंजूर करून वितरित करण्यात आले.

त्यानुसार मोहाडी तालुक्यात येणाऱ्या पाहुणी (खात रोड) येथे ग्रीशा फूड इंडस्ट्रीज कंपनीची (उद्योगाची) स्थापना २० मार्च २०२३ ला करण्यात आली. यात गव्हाच्या पीठाची विक्री करणे, शेतकऱ्यांचे गहू फिल्टर (स्वच्छ) करून देणे व विक्री करणे (उत्पादने) या उत्पादनांची निर्मिती करण्यात येते. PMFME योजनेंतर्गत ८ लाख ७१ हजार ५०० रूपयांचे अनुदाना करिता संतोष लांजेवार पात्र झाले आहे.

सदर यंत्र सामग्रीच्या माध्यमातून प्रतिदिन उत्पादन क्षमता ५ टन आटा पिसाई व २५ टन गव्हू फिल्टर (स्वच्छ) केले जात आहे. त्यामध्ये उत्पादनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढून येत आहे.

उत्पादनाची विक्री जिल्ह्याबाहेर सुरू आहे. आणि यापासुन मासिक २ लक्ष शुध्द नफा मिळवत आहे.

हा व्यवसाय सुरु केल्यानंतर आज पर्यंत यशस्वी आणि उन्नती झाल्याचे ग्रीशा फूड इंडस्ट्रीज द्वारे नागरिकांना मालती आटा मिल व गहू स्वच्छ, फिल्टर करणे या बाबतची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला आहे. या युनिटला अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात नागरिकांचा व त्या परिसरातील शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग मिळत आहे. ग्रीशा फूड इंडस्ट्रीज कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मालती आटा नागपुर, गोंदिया, भंडारा जिल्हयासह शहरातील हॉटेल, खानावळ, किराणा दुकानामध्ये पुरविला जातो. तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील काही शहरामध्ये मालती आट्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

त्यामाध्यमातून आज आपण स्थानिक व राज्यस्तरावर गहू आटा व गहु स्वच्छ, फिल्टर करून देण्याची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यशस्वी ठरत आहोत. तसेच हा व्यवसाय सुरु केल्यानंतर आलेले यश व झालेल्या उन्नतीचा मार्ग पहावयास मिळत आहे. असे मत ग्रीशा फूड इंडस्ट्रीजचे संचालक संतोष कृष्णा लांजेवार यांनी प्रतिनीधीशी बोलतांना सांगितले आहे.

ग्रीशा फूड इंडस्ट्रीजमध्ये एकुण ७ मजूर कार्यरत आहेत. यात २ करोड ५० लक्ष रुपये प्रती वर्ष आर्थिक उलाढाल असुन निव्वळ नफा २५ लक्ष रुपये अपेक्षित आहे. ग्रीशा फूड इंडस्ट्रीज द्वारे सुरू असलेल्या मालती आटाच्या माध्यमातून ही सुविधा राज्याबाहेर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याची इच्छाशक्ती आहे.

जिद्द, चिकाटी, कठोर मेहनत यामुळे यश शक्य संतोष लांजेवार खरतर संतोष लांजेवार या तरूण युवकाने इलेक्ट्रीक डिप्लोमा केला आहे. वडिलोपार्जित शेती नाही. मात्र घरी आटा चक्की आहे. कुटुंबात आई-वडिल, दोन भाऊ, बहीण, पुतण्या-पुतणी असा परिवार आहे. आई-वडिल अल्प शिक्षित आहेत. मात्र मुलांवर योग्य संस्कार व योग्य शिक्षण देणे गरजेचे आहे. असे लांजेवारच्या आई-वडिलांना वाटत होते. कारण मुलेच ही संपत्ती आहे. म्हणून संतोष व भाऊ आई – वडिलांच्या कामात मदत करत असायचा. ते करत असतांनी नगर परिषदेचे शहर प्रकल्प व्यवस्थापक प्रविण पडोळे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत माहीती दिली आणि त्यातुनच ग्रीशा फूड इंडस्ट्रीजचा उदय झाला त्यामाध्यमातुन मालती आटाची सुरूवात केली. आणि विदर्भात मालती आटयाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ठरला संतोष लांजेवार चा आदर्श ठरला आहे.

लहान उद्योगामधून मोठ्या उद्योगाकडे वाटचाल करण्यामध्ये भंडारा नगर परिषद दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, शहर अभियान व्यवस्थापन कक्षाचे मोलाचे योगदान आहे. जर संबंधित विभागाचा पाठबळ मिळाला नसता तर माझी ओळख पटली नसती.

संतोष लांजेवार

यशस्वी उद्योजक ग्रीशा फूड इंडस्ट्रीज पाहुणी