मी रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित महामंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

मी रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित महामंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

गडचिरोल, दि.19: महामंडळाची स्थापना १ मे, १९७४ रोजी कंपनी अधिनियम १९५६ अन्वये अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील ( चांभार, ढोर, होलार, मोची इत्यादी) यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जातात. महामंडळामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या (एन.एस.एफ.डी.सी.) योजना राबविण्यात येत असून ४८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. १) एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजने अंतर्गत स्मॉल बिझनेस रु.१.०० लाख,१.५० लाख व २.०० लाख, चर्मोद्योग रु.२.०० लाख, लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी रु.५०,०००/- या योजनांसाठी मागील प्रलंबित नस्तींकरिता रु.२२.२१ कोटी इतका निधी प्राप्त झालेला आहे.२) तसेच सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एन.एस.एफ.डी.सी. यांच्या मुदती कर्ज योजने अंतर्गत स्मॉल बिझनेस रु.५.०० लाख, लघु ऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी रु.१.४० लाख तसेच नवीन महिला अधिकारीता योजना रु.५.०० लाख मंजूर झालेल्या आहेत. ३) एन.एस.एफ.डी.सी. यांच्या शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली असून भारतामध्ये रु.२०.०० लाख व विदेशामध्ये रु.३०.०० लाखापर्यंत कर्ज मंजूर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी नजीकच्या महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेट द्यावी. सर्व चर्मकार बांधवांना विनंती आहे की या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे व्यवस्थापकीय संचालक संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई, धम्मज्योती गजभिये यांनी कळविले आहे.