रस्ता सुरक्षा विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन संपन्न

रस्ता सुरक्षा विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन संपन्न

गडचिरोली, दि.06:गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 15 जानेवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 35 वे रस्ता सुरक्षा अभियान 2024 राबविण्यात येत आहे. सदर अभियाना दरम्यान रस्ता सुरक्षा विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी येथे रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणात हेल्मेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लालसिंग खालसा, प्राचार्य हे होते. प्रमुख पाहुणे विजय चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे महत्व तसेच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची आकडेवारी सांगून सर्वांना रस्ता सुरक्षा का आवश्यक आहे. याबाबत संवेदना जागृत करुन त्यांची जाणिव निर्माण करुन दिली.
यावेळी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता रस्ता सुरक्षा विषयक प्रश्नमंजूषा घेण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यकमास एकुण 150 ते 200 विद्यार्थी उपस्थित होते. महात्मा गांधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात तसेच बस स्टैंड, आरमोरी येथे पथनाट्य सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सुरवात सहा. मोटार वाहन निरीक्षक ओ. पी. मेश्राम यांनी करुन रस्ता सुरक्षेची आवश्यकता सांगीतली. यावेळी मोटार वाहन निरीक्षक गोपाल धुर्वे व किरण शिंदे, मोटार वाहन निरीक्षक यांनी रस्ता सुरक्षेविषयक माहिती दिली. कार्याकमाच्या यशस्वीतेसाठी गौरी राऊत यांनी विशेष मेहनत घेतली. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली विजय चव्हाण यांनी कळविले आहे.