समाजसेविका संस्थांकरिता 18 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज आमंत्रित

महिला व बाल विकास विभाग क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेविका संस्थांकरिता 18 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज आमंत्रित

गडचिरोली,(जिमाका)दि.18:महिला व बाल विकास विभागाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेविका यांना तसेच महिला व बाल विकास विभागाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांकरिता विभागामार्फत अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 2020-21, 2021-22, 2022-23, व 2023-24 या वर्षाकरीता सामाजिक कार्यकर्ती व संस्थांकडुन प्रस्ताव मागविण्यात येत आहे. सदर पुरस्काराचे स्वरुप महिला व बाल विकासासाठी झटणाऱ्या नामवंत समाजसेविका व सामाजिक संस्था पुढीलप्रमाणे पात्र राहतील.

पुरस्काचे तपशिल- राज्यस्तरीय पुरस्कार, स्वरुप- रु.1,00,001/ रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानचिन्ह, शॉल, श्रीफळ, पुरस्कार- प्रत्येक वर्षाकरिता एक महिलेला पुरस्कार देण्यात येईल, अनुभव- महिला व बाल विकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या 25 वर्षाचा अनुभव. पात्रता- ज्या महिलांना दलितमित्र पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त महिलांना सदर पुरस्कार अनुज्ञेय नाही. 5 वर्षानंतर राज्यस्तरीय करीता पात्र राहतील. महिलेच्या आयुष्यभरात एकदाच राज्यस्तरीय पुरस्काराकरीता पात्र राहील.

विभागस्तरीय पुरस्कार (फक्त संस्थाकरिता)- स्वरुप- रु.25,001/-, रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानचिन्ह, शॉल, श्रीफळ, पुरस्कार- विभागस्तरावर एक संस्थेला पुरस्कार देण्यात येईल. अनुभव-महिला व बाल विकासाच्या क्षेत्रात काम करण्याच्या 07 वर्षाचा अनुभव. पात्रता- ज्या संस्थांना दलितमित्र पुरस्कार, प्राप्त संस्थांना सदर पुरस्कार अनुज्ञेय नाही. संस्था ही राजकारणापासुन अलिप्त असावी.

जिल्हास्तरीय पुरस्कार- रु.10,001/ रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानचिन्ह, शॉल, श्रीफळ, पुरस्कार-प्रत्येक वर्षाकरीता जिल्हास्तरावर एक महिलेला पुरस्कार देण्यात येईल. अनुभव- महिला व बाल विकासाच्या क्षेत्रात काम करणाच्या 10 वर्षाचा अनुभव, पात्रता- ज्या महिलांना दलितमित्र पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त महिलांना सदर पुरस्कार अनुज्ञेय नाही. महिलेच्या आयुष्यभरात एकदाच जिल्हास्तरीय पुरस्काराकरीता पात्र राहील.

इच्छुक महिला व संस्थानी विहीत नमुन्यातील अर्ज 18 ऑगस्ट 2023 पर्यत कार्यालयीन वेळेत जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात सादर करावा. तसेच अधिक माहितीकरिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बॅरक क्रं.01 रुम नं. 26,27 कॉम्पलेक्स, गडचिरोली यांच्याकडे संपर्क करावा व विहीत मुदतीत प्रस्ताव सादर करावा. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, गडचिरोली, प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे.