वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाची साठवणूक करून अत्याधुनिक सोई,सुविधा व सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन.

वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाची साठवणूक करून अत्याधुनिक सोई,सुविधा व सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन.

 

गडचिरोली, दि.15: गडचिरोली: महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम असून राज्यभरात गोदामांचे जाळे निर्माण करून औद्यागिक व कृषी क्षेत्रास अन्यधान्याची नासाडी होऊ नये म्हणून साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी वखार महामंडळाची 8 ऑगस्ट 1957 ला निर्मिती करण्यात आलेली आहे. महामंडळाद्वारे शेतीमाल तसेच शेतीसाठी लागणारे बी-बियाणे,कीटकनाशके याची शास्त्रोक्त पद्धतीने सुरुक्षित साठवणूक करण्यासाठी सुविधा उपलब्द करून दिली जाते. महामंडळाची मुंबई,पुणे,नागपूर,कोल्हापूर,नाशिक,अमरावती,औरंगाबाद,लातूर,हि 8 विभाग आहेत. राज्यातील महामंडळाची एकूण 205 वखार केंद्रावर 1260 गोदामांची एकूण साठवणूक क्षमता 21.15 लाख मी.टन इतकी आहे. महामंडळाच्या नागपूर विभागात नागपूर ,वर्धा,चंद्रपूर,गडचिरोली, गोंदिया,भंडारा,हे जिल्हे असून याअंतर्गत एकूण 19 वखार केंद्रावर 110 गोदामे असून साठवणूक क्षमता 1.96 मे.टन इतकी आहे.

शेतमाल उत्पादन बरोबरच शेतमालाची सुरक्षित साठवणूक व त्याची विक्री व्यवस्थापन देखील महत्वाचे आहे. सुगी हंगामाच्या वेळी बाजारपेठेत शेतमालाची आवक जास्त होत असल्याने शेतकऱ्यांना कमी दारात शेतमालाची विक्री करावी लागते. अशावेळेस कृषिमालाच्या साठवनूकीस प्राध्यान्य देऊन महामंडळ राज्यातील सर्व ठिकाणच्या गोदामामध्ये या हंगामात नियोजन करीत आहे. महामंडळाच्या सर्व गोदामांच्या शत्रोक्त पद्धतीने शेती औद्योगिक मालाची साठवण केली जाते.ठेवीदारांना दिलेली महामंडळाची वखार पावती परक्रम्य लेख ( Negotiable Instrument) असल्याने ती बँकेकडे तारण ठेवल्यास,ठीविदाराना बँकेकडून त्वरित कर्ज उपलब्द होते. त्याआधारे शेतकऱ्यांना हंगामात अर्थ साहाय्य व नंतर बाजारभाव येईपर्यंत गोदामात साठवणुकीची सोय मिळते. शेतकऱ्यांनी चालू पिकांचा 7/12 उतारा दिल्यानंतर वखार भाड्यात प्रचलित साठवण दारात 50% सवलत देऊन 25% जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. याशिवाय, प्रत्येक पंधरवाध्यामध्ये कीड प्रतिबंधात्मक व दर तीन महिन्यांनी उपचाराक्तमक किटकनाशकांचा वापर करून माल सुरक्षित ठेवण्यात येतो. साठवनूकीस असलेल्या सर्व मालाचा 100% विमा संरक्षण दिल्या जाते,त्यामुळे नुकसान झाल्यास योग्य ती भरपाई दिल्या जाते.

 

याशिवाय, वखार महामंडळ व महाराष्ट्र सहकारी बँक यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी व शेतरी उत्पादक कंपनी यांचेकरिता अभिनव ऑनलाईन तारण कर्ज योजना ब्लोकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून राबविण्याचा येत आहे. याअंतर्गत पात्र शेतकरी किव्हा शेतकरी उत्पादक कंपनी यांना वखार पावतीवरील शेतमालाच्या किमतीच्या 70% कर्ज बँकेकडून संबंधितांच्या खात्यात आरटीजीएस अथवा एनएफटीद्वारे जमा करण्यात येते. सदर तारण कर्जाचा व्याजदर 9 % असून इतर बँकेच्या तुलनेत सर्वात कमी आहे. तारण कर्जाची मर्यादा 10 लाख प्रति शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी प्रति 75 लाख इतकी आहे. महामंडळाच्या गोदामात साठवानुकीस ठेवण्यात येणाऱ्या शेतमालाच्या वखारपावतीवर ऑनलाईन तत्काळ कर्ज उपलब्द होत असल्याने संबंधीत शेतकरी/ठेवीदार यांचे वेळेची बचत होऊन कागदपत्रांसाठीच्या प्रवास खर्चात बचत होण्यास मदत होते. शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपनी यांनी या सुविधांचा लाभ सुगीच्या काळात व्यापारांना माल न विकता तो वखार महामंडळाच्या गोदामात ठेवावा,असे आवाहन नागपूर विभागप्रमुख अजय कडू यांनी केली आहे.