ग्रामपंचायत बेरोडी (पु) व अर्जुनी (पु) येथील प्राप्त झालेल्या हरकती व सुचना नागरिकांकरिता प्रसिध्द

ग्रामपंचायत बेरोडी (पु) व अर्जुनी (पु) येथील प्राप्त झालेल्या हरकती व सुचना नागरिकांकरिता प्रसिध्द

 

भंडारा, दि. 17: ग्रामपंचायत बेरोडी (पु) व अर्जुनी (पु) येथील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की,

भंडारा तालुक्यातील माहे जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या बेरोडी (पु) व अर्जुनी (पु) या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षणावर दिनांक 3 जुलै 2023 पर्यंत हरकती व सुचना मागविण्याकरिता दिनांक 26 जून 2023 रोजी परिशिष्ट 13, नमुना-ब संबंधित ग्रामपंचायतीचे सुचना फलकावर, तहसिल कार्यालय व पंचायत समिती भंडारा येथील सुचना फलकावर सर्व नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिध्द करण्यात आली होती.

त्यानुसार प्राप्त झालेल्या हरकती व सुचना निकालात काढून अंतिम आरक्षणाचा परिशिष्ट 16, नमुना अ दिनांक 14 जुलै 2023 रोजी संबंधित ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर, तहसिल कार्यालय व पंचायत समिती भंडारा येथील सुचना फलकावर सर्व नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिध्द करण्यात येत आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी (ग्रापनि) यांनी कळविले आहे.