“रोगनिदान व आरोग्य तपासणी शिबीर “

“रोगनिदान व आरोग्य तपासणी शिबीर “

 

भंडारा : दिनांक १४/०७/२०२३ रोजी सकाळी १०.०० पासुन पोलीस बहुउद्देशीय सभागृह येथे मा. पोलीस अधिक्षक श्री. लोहित मतानी भंडारा यांचे संकल्पनेतुन श्रीकृष्ण हॉस्पीटल व कीटीकल केअर सेंटर व भंडारा जिल्हा पोलीस यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आली. सर्व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी व त्याचे कुंटुबियाकरीता “संपुर्ण शारीरीक तपासणी ई. सी.जी., रक्तसाखर, रक्तदाब, ऑक्सीजन लेव्हल तपासणी व उपचार करुन औषधी वितरण करण्यात आले.

 

यावेळी कार्यक्रमाला मा. पोलीस अधिक्षक श्री. लोहित मतानी भंडारा, अपर पोलीस अधिक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधीकारी भंडारा डॉ. श्री. अशोक बागुल यांचे उपस्थितीत, कार्यक्रम शिबीरामध्ये प्रमुख पाहुणे डॉ. श्री. फुलवाणी श्रीकृष्ण हॉस्पीटल नागपुर व त्याची चमु, डॉ. श्री. नागपुरे भंडारा, डॉ. श्री. शेंडे भंडारा श्री. बत्रा भंडारा, श्री. मनिष पाटील, श्री. नितीन तितीरमारे महालॅब प्रमुख यांचे उपस्थितीत पोलीस रुग्नालय होमकुमार चारमोडे ( औषधी संयोजक ) यांचे मार्गदर्शनात रोपटे देवुन वैद्यकीय तपासणी शिबीर या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 

यावेळी मा. पोलीस अधीक्षक यांनी पोलीस अधिका-यांना व कर्मचा-यांना आरोग्या बाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. फुलवाणी यांनी हृदयरोगाबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. बत्रा यांनी तंबाखु बाबत मार्गदर्शन केले.

 

सदर वैद्यकीय तपासणी दरम्यान पोलीस निरीक्षक गढरी कल्याण शाखा भंडारा, पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक रघुनाथ चौधरी, सर्व शाखेचे पोलीस अंमलदार तसेच पोलीसांचे कुंटुंबिय, सेवानिवृत्त , ‘कर्मचारी असे एकुण २२७ पोलीस कुटुंबिय हजर होते.

 

तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा डॉ. श्री. अशोक बागुल यांनी आरोग्य शिबीरबाबत प्रास्तावीक समारोप देवुन कार्यक्रमाची सांगता झाली.