तुला बर्थडे गिफ्ट देतो म्हणुन अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस

तुला बर्थडे गिफ्ट देतो म्हणुन अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस

 

सिंदेवाही येथे काही दिवसांपूर्वी एका बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमात आरोपीने विद्यार्थिनीला एक ट्राफी व प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे आरोपीची विद्यार्थींनी सोबत ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत आरोपीने विद्यार्थींनीच्या घरी येणे जाणे सुरू केले. त्यामुळे विद्यार्थींनीचे आईवडीलां सोबत जवळीकता आली. अंदाजे पधरा दिवसांपूर्वी सिंदेवाही शहरात त्या विद्यार्थींनीला शिक्षण पुर्ण करण्यासाठी सुविधा म्हणून किरायाची रुम आरोपीने करून दिली.

काल दि. १२/०७/२०२३ रोजी दुपारी साडे चार वाजता सूमारास आरोपीने विद्यार्थींनीला फोन करून शाळेच्या महत्त्वाचे कामाने चर्चा करायची आहे म्हणून घरी येतो असं सांगितलं काही वेळाने तो आरोपी घरी गेला तेव्हा विद्यार्थीनी घरात एकटी होती. ओळखीचा व्यक्ती घरी आल्याने माना सन्मानाने संभाषण सुरू होतं. त्या दरम्यान विद्यार्थींनिने आरोपीला पाण्याचं ग्लास दिल आरोपीने पाणी पिले व ग्लास खाली ठेवत विद्यार्थींनीला म्हणु लागले की, तुझा बर्थडे आहे. मी तुला गिफ्ट म्हणून ड्रेस घेवुन देतो. असे म्हणाले व खाटेवर बसुन विद्यार्थीनी सोबत अश्लील चाळे सुरु करण्यात सुरुवात केल्याने संतापलेली विद्यार्थीनिने आरोपीला जोरदार धक्का देऊन दुर केला. निर्लज्ज प्रकार घडल्यांनंतर पोलिस स्टेशन सिंदेवाही ला पिडीतीने प्रत्यक्ष येवून आरोपी विरोधात काल रात्री तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून आरोपींविरुद्ध भा.द.वी.३५४,भा.द.वी.३५४-ए, भा.द.वी.४५१, पॉक्सो एक्ट दाखल केले आहे. पोलिसांची पुढील कार्यवाही सुरू आहे.