जागतिक मधमाशी दिन पुरस्कार वितरण सोहळा आयोजन

जागतिक मधमाशी दिन पुरस्कार वितरण सोहळा आयोजन

गडचिरोली,दि.02 : मध संचानालय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाबळेश्वर जिल्हा सातारा येथे दिनांक 20 मे 2023 रोजी मधमाशी दिनाचे औचित्य साधुन मधमाशा पालन उद्योगामध्ये उत्कृष्ठ काम केलेल्या लाभार्थींस मधमाशी मित्र पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. मंडळाचे मध संचानालय महाबळेश्वर येथे पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 20 मे 2023 रोजी आयोजित केलेला आहे. तेव्हा मधमाशा उद्योगामध्ये सातेरी, मालीफेरा व आग्या मधमाशांचे संगोपन करुन मधाचे उत्पादन घेणाऱ्या व्यक्ती/ संस्था यांचे कडून पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार. या करीता अर्ज मागविण्यात येत आहे. तेव्हा जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा सत्र न्यायालयाचे बाजुला, एम आय डी सी रोड या ठिकाणी अर्जासाठी संपर्क साधावा. व सदरचा अर्ज दिनांक 05 मे 2023 पर्यंत कार्यालयास सादर करावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, गडचिरोली यांचे द्वारे करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क- श्री. बी.एल.मेश्राम, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तसेच श्री. एल.डी.गेडाम औद्यो. पर्यवेक्षक महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, गडचिरोली.

संपर्क नंबर- 07132-222059, 9421817954/7744008420/8605716318