महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या 45 व्या वर्धापण दिनानिमीत्य विविध कार्यक्रमाचे आयोजन संपन्न

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या 45 व्या वर्धापण

दिनानिमीत्य विविध कार्यक्रमाचे आयोजन संपन्न

गडचिरोली, दि.11: दिनांक 10 जुलै 2023 रोजी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या 45 व्या वर्धापण दिनानिमीत्य जिल्हा कार्यालय गडचिरोली येथे एन.एस.एफ.डि सी. योजनेअंतर्गत लाभर्थ्यांना धनादेश वितरण, प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.त्याप्रसंगी डॉ.सचिन मडावी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण गडचिरोली व एम.डि.बारमासे जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित गडचिरोली यांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलीत करण्यात आले. या कार्यक्रमात एन.एस.एफ.डि सी. योजनेअंतर्गत पुरूषोत्तम नामदेव लाडे यांना रेडीमेड कापड या व्यवसायाकरीता रूपये 300000/- व भिमपाल गुंडाजी फुलझेले यांना रेडीमेड कापड या व्यवसायाकरीता रूपये 300000/- धनादेश वितरीत करण्यात आले व महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पुर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना रू.3000/-विद्यावेतनाचे धनादेश वितरीत करण्यात आले तसेच सामाजिक न्याय भवनाच्या परिसरात वृक्षारोपण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता महामंडळाचे कर्मचारी प्रणव डाबरे, पुरूषोत्तम कस्तुरे, साईनाथ जेंगठे व मिथुन बरडे यांनी सहकार्य केले.

योजना :- अनुदान योजना – प्रकल्प मर्यादा 50000/- पर्यंत सदर योजनेत 40000/- कर्ज बॅकेमार्फत दिले जाते व रूपये 10000/- पर्यत अनुदान महामंडळामार्फत देण्यात येते. बॅक कर्जावर बॅकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते.कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे.

बिजभांडवल योजना – प्रकल्प मर्यादा रू.500000/- पर्यंत प्रकल्प मर्यादेच्या 20% बिजजभांडवल कर्ज महामंडळामार्फतत 4% द.सा.द.शे व्याजदराने देण्यात येते.सदर राशीमध्ये महामंडळाचा अनुदानाचा समावेश आहे.75% पर्यत कर्ज बॅकेमार्फत दिले जाते. व सदर कर्जावर बॅकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सदर कर्जावर बॅकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येते. महामंडळाच्या व बॅकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवुन दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षात करावी लागते.व 5 % लाभार्थ्याचा सहभाग असतो.

एन.एस.के.एफ.डि.सी योजना (राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास योजना )

एन.एस.के.एफ.डि.सी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर अस्वच्छ काम करणाऱ्या सफाई कामगारांचे व त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या कुटुबिंयाचे पुणर्वसन करण्याकरीता राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाची स्थापना केली आहे. त्यात विविध व्यवसायाकरीता 15 लाख कमाल मर्यादेपर्यंत कर्ज देण्यात येते. सदर कर्जावर 6% व्याज आकारल्या जाते. व या योजनेत लाभार्थ्यांचा सहभाग 5 टक्के असते.