पोंभुर्णा तहसील कार्यालय दुरुस्तीकरिता 30 लक्ष रुपयाची प्रशासकीय मान्यता

पोंभुर्णा तहसील कार्यालय दुरुस्तीकरिता 30 लक्ष रुपयाची प्रशासकीय मान्यता

बोर्डा येथे होणार नवीन तलाठी कार्यालय

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

 

चंद्रपूर, दि. 9 : पोंभूर्णा तहसील कार्यालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी 30 लक्ष आणि बोर्डा (ता. चंद्रपूर) येथे नवीन तलाठी कार्यालयासाठी 30 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.

 

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत शासकीय कार्यालयीन इमारत दुरुस्ती बाब 27-लहान बांधकामे अन्वये, पोंभुर्णा, तहसील कार्यालयाच्या इमारतीचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे . त्यासोबतच, शासकीय कार्यालयीन इमारत बांधकाम बाब 53-मोठी बांधकामे या शिर्षा खाली, बोर्डा येथील तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. याबाबत या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

जिल्ह्याच्या विकासासाठी कायम आग्रही राहणारे पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी सैनिकी शाळा ,वन अकादमी,देखणे बसस्थानके,ई लायबरी,बॉटनिकल गार्डन, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र,नियोजन भवन, कोषागार भवन, अभ्यासिका, वस्तीगृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल, वन विभागाची देखने विश्रामगृह, इको पार्क, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, एसएनडीटी महिला विद्यापीठ केंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र अशा अनेक योजनांच्या रूपाने चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात मोठी भर टाकत कायम जनतेसाठी विकासाची दालने उभी केली आहेत.