शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने

शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने

Ø गृहपालाशी संपर्क साधून अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 07: सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यातील चंद्रपूर, वरोरा, सिंदेवाही, राजुरा व ब्रह्मपुरी येथील मुलांचे वसतिगृह आणि चंद्रपूर, मुल, बल्लारपूर, चिमूर, ब्रह्मपुरी येथील मुलींच्या वसतीगृह प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांनी संबंधित वसतीगृहाच्या गृहपालांशी संपर्क साधून अर्ज प्राप्त करून घ्यावा व सदर अर्ज गृहपाल यांच्याकडे सादर करावा.

 

शालेय विद्यार्थ्यांनी ऑफलाइन प्रवेशासाठी 12 जुलै 2023 पर्यंत अर्ज करावा. इयत्ता 10वी व 11वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) व बी. ए., बी. कॉम, बी.एस.सी अशा बारावीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका/पदवी आणि एम. ए., एम. कॉम, एम. एस. सी. असे पदवीनंतरचे पदव्युत्तर पदवी, इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करावा. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शासकीय वसतीगृह प्रवेशासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या जाईल, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.