डी. एल. एड प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन सादर करण्यास 4 जुलै पर्यंत मुदतवाढ

डी. एल. एड प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन सादर करण्यास 4 जुलै पर्यंत मुदतवाढ

 

भंडारा दि. 30: शैक्षणिक वर्ष सन 2023-24 साठी डी. एल. एङ प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या सविस्तर सुचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे www.maa.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

13 जून 2023 पासून www.maa.ac.in या संकेत स्थळावर अर्ज भरण्यास सुरूवात झालेली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 4 जुलै 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचा स्वत:चा Email ID असणे बंधनकारक आहे. प्रवेश अर्ज शुल्क खुला संवर्ग रूपये 200, खुला संवर्ग वगळून अन्य संवर्ग रूपये 100 असे राहील. उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज करावयाचा असेल तर प्रत्येक माध्यमाच्या संवर्गानुसार स्वतंत्र आवेदनपत्र व शुल्क भरावे लागेल. प्रवेश अर्ज शुल्क स्विकारण्याची पध्दती प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन / Payment gateway/E-wallet स्वतःचे किंवा नातेवाईकाचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड याद्वारे स्विकारले जाईल.

प्रवेश पात्रता-प्रवेशास इच्छुक असणारे कला, वाणिज्य, विज्ञान व एम.सी.व्ही.सी शाखेतील पात्र उमेदवार इयत्ता बारावी खुल्या संवर्गासाठी किमान 49.5 टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी किमान 44.5 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन कोटयातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रक्रीयेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे. उमेदवारांना प्रवेश अर्ज भरतांना तांत्रिक अडचणी असल्यास अशा अडचणी स्वतःच्या registered Email वरून Support@deledadmission.inया इमेलवर पाठवाव्यात. प्रवेशाबाबतचे वेळापत्रक संकेत स्थळावर प्रसिध्द केले जाईल. या बाबत वर्तमानपत्रात पुन्हा स्वतंत्र जाहीरात दिली जाणार नाही. त्यासाठी उमेदवाराने वेळोवेळी संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.