अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांसाठी शिधावस्तुंचे वितरण

अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांसाठी शिधावस्तुंचे वितरण

भंडारा दि. 28: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शासनाकडून नियतन प्राप्त झालेले आहे. रास्तभाव दुकानदारांना पुरवठा करून कार्यरत पात्र शिधापत्रिकाधारकांना तातडीने मोफत वितरण करण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे.

जुलै 2023 मध्ये प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांना प्रति व्यक्तीला 4 किलो तांदुळ, 1 किलो भरडधान्य (मका) व अंत्योदय प्रति शिधापत्रिका लाभार्थ्यांना 5 किलो गहु, 25 किलो तांदूळ, 5 किलो भरडधान्य (मका) व 1 किलो साखर शिधावस्तुचे वितरण उपलब्ध करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी कळविलेआहे.