परदेशातील शिक्षणाकरिता अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती

परदेशातील शिक्षणाकरिता अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती

 

भंडारा दि.27: अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना परदेशातील शिक्षणाची संधी मिळावी म्हणुन परदेशातील विद्यापीठामध्ये विविध अभ्यासक्रमासाठी ज्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशा विद्यार्थ्याना परदेशातील शिक्षणाचा खर्च भागविण्याकरिता अनुदान म्हणुन शिष्यवृत्ती देण्याची तरतुद शासनातर्फे करण्यात आली आहे.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रुपये 6 लाख पर्यत वाढविण्यात आले आहे. या योजने अंतर्गत विद्यार्थ्याना परदेशात एम.बी.ए. पदव्युतर, वैद्यकीय अभ्यासक्रम, पदवी/ पदव्युतर, बी.टेक इंजिनिअरींग विज्ञान व कृषी पदव्युतर अभ्यासक्रमाकरीता शिष्यवृत्ती देण्याची शासनाची तरतुद आहे.

 

वर्ग 12 वी व पदवी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या व परदेशात शिष्यवृत्तीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातुन शिष्यवृत्तीसाठी अर्ज नमुना विनामुल्य प्राप्त करुन घ्यावा. आवश्यक कागदपत्र प्रमाणित प्रतिसह अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या कार्यालयामार्फत अपर आयुक्त, आदिवासी विकास नागपुर यांचेकडे सादर करावयाचे आहेत. या योजनेचा अनुसुचित जमातीच्या विदयार्थांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आव्हान प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प निरज मोरे यांनी केले आहे.