कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कृषी सेवक पद भरती संदर्भात

कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कृषी सेवक पद भरती संदर्भात

गडचिरोली, दि.22: शासन निर्णय दि.31 ऑक्टोंबर, 2022 नुसार ज्या विभाग /कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अद्याप मंजूर झालेला नाही, अशा विभाग /कार्यालयातील गट-अ, गट-ब व गट-क मधील (वाहनचालक वगट-ड संगवर्गातील पदे वगळून ) सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत कृषी विभागाचा सुधारित आकृती बंध अद्याप अंतिम झालेला नसल्यामूळे या शासन निर्णयातील तरतूदी नुसार रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेत पदभरती करता येणार आहे. कृषी आयुक्तालयाचे अधिनस्त विविध गट-क संवर्गातील सरळसेवा पदभरती आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यास शासन मान्यता प्राप्त झालेली असून आय.बी.पी.एस.(I.B.P.S.) या संस्थेसोबत तसा सामंजस्य करार (MoU) करण्यात आलेला आहे. तसेच कृषी विभागातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक, लघु टंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी ) व लघुलेखक (उच्च श्रेणी ) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच मा.राज्यपाल महोदयांच्या दि. 29.08.2019 च्या अधिसूचनेनुसार अनुसूचित/ आदिवासी क्षेत्रातील (पेसा) 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरणेबाबत कळविण्यात आले आहे, त्यामध्ये कृषी सहाय्यक संवर्गाचा समावेश आहे. शासन निर्णय सा.प्र.वि. दि. ०१/०२/२०२३ व दि.10/05./2023 नुसार विभागीय कृषी सहसंचालक ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व लातूर या विभागातील पेसा क्षेत्रातील मुख्यालय निश्चिती व पदसंख्या निश्चित करण्याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय विभागाची मान्यता प्राप्त करून घेणेबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. यास्तव कृषी सेवक पदांसाठी जाहिरात देणे शक्य झालेले नाही. सद्यस्थितीत पेसा क्षेत्रातील पदे निश्चित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून त्याअंती निश्चित होणारी पदे यांचा विचार करून राज्यातील कृषी सहाय्यक यांची सरळसेवेच्या कोटयातील एकूण २५८८ रिक्त पदे विचारात घेता रिक्त पदांच्या ८० टक्के म्हणजेच २०७० एवढ्या या पदांवर कृषी सेवक म्हणून नियुक्ती देण्यासाठी पद भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे कळविले आहे.