9 जून रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

9 जून रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर, दि. 7 जून : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर अंतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे दि. 9 जून 2022 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यामध्ये  महाराष्ट्रातील महिंद्रा अँड महिंद्रा, नागपूर येथील वैभव इंटरप्राईजेस, मिहान येथील नामांकित कंपनी, परम स्किल ट्रेनिंग सेंटर, बडगे इंजिनिअरिंग तसेच स्थानिक समाधान पूर्ती, लोटस हॉस्पिटॉलिटी आदी नामांकित कंपन्यांचा समावेश राहणार आहे. या कंपनीमार्फत एकूण 826 रिक्त पदे भरण्याचे नियोजित आहे.

तरी, जिल्ह्यातील 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर, आयटीआय, अभियांत्रिकी व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा. रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, पहिला माळा हॉल क्र. 5 व 6 येथे प्रत्यक्ष अथवा 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.