मातीच्या ढिगाऱ्या खाली दबुन मृत्यु प्रकरणात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल दोन आरोपी अटकेत…

मातीच्या ढिगाऱ्या खाली दबुन मृत्यु प्रकरणात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल दोन आरोपी अटकेत…

 

दिनांक 17 जून, 2023 रोजी रात्रौ 08:00 वाजताचे सुमारास माजरी – कोंढा रस्त्यावरील चालबर्डी बस स्टॉपकडुन चालबर्डी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विजय रामदास मत्ते वय 50 वर्ष रा. चालबर्डी यांनी एम्टा खदान येथील ओ. बी. मातीचे 2 हायवा ट्रक आपल्या खाजगी कामासाठी खाली केले होते. सदर मातीचा ढिग हा रस्त्यावर असल्याने वाहने जाण्यासाठी अडचण होत असल्याचे कारणावरुन माती टाकुन घेणारे विजय मत्ते व गावातील अनिल विठठल मत्ते, निशांत झाडे, अमोल उपरे, बंडु डाहुले व करण खापणे यांचे सोबत वादविवाद होवुन अनिल मत्ते व विजय मत्ते यांचे धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर सदर ठिकाणी गावाचे सरपंच श्री विजय खंगार व ईतरांनी येवुन वाद सोडवुन विजय मत्ते यांना सदर माती तात्काळ रस्त्यावरुन बाजुला करण्याचे सर्वांना गावात जाणेस सांगितले होते. परंतु अनिल मत्ते हा मातीच्या ढिगाऱ्याचे बाजुला रस्त्याच्या कडेल पडुन असल्याचे कुणाचेही लक्षात आले नाही. त्यानंतर विजय मत्ते यांनी एम्टा साईडींग येवुन डोझर बोलावुन रस्त्यावरील मातीचा ढिग हा रस्त्याच्या कडेला ढकलुन दिला व घरी निघुन गेले. त्यानंतर झालेल्या भांडणाबाबत विजय मत्ते यांनी पो.स्टे. माजरी येथे तकार दिल्याने अपराध क्रमांक 68 / 2023 कलम 143, 149, 323 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवुन गुन्हयाचा तपास सुरु होता.

 

परंतु अनिल मत्ते हा दिनांक 18 जून, 2023 रोजीचे 14:00 वाजे पावेतो घरी परत न आल्याने त्याचे कुटूंबियांनी त्याचा शोधाशोध घेतला परंतु तो कोठेही मिळुन आला नाही तेंव्हा तो मातीचे ढिगाऱ्यात दबुन गेल्याबाबत त्यांना शंका आलयाने रात्रौ 21:00 वाजताचे सुमारास चालबर्डी बसस्टॉप जवळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असणारा मातीचा ढिगारा ढकलेल्या ठिकाणाची माती बाजुला केली असता सदर मातीमध्ये अनिल विठठल मत्ते वय 38 वर्ष रा. चालबर्डी याचा मृतदेह मिळून आला.

 

विजय मत्ते व अनिल मत्ते यांचे झटापटीत अनिल मत्ते हा मातीचे ढिगाऱ्याजवळ पडुन असलेबाबत विजय मत्ते याने कुठलीही शहानिशा न करता तो तेथुन उठुन गेल्याबाबत खात्री न करता सदर ठिकाणी प्रकाशाची पुरेशी व्यवस्था नसतांनाही रात्रीचे अंधारात विजय रामदास मत्ते व डोझर ऑपरेटर मंगेश रामचंद्र उपरे रा. विजासन भद्रावती यांनी मातीचा ढिगारा ढकलुन दिल्याने सदर ढिगाऱ्याखाली अनिल विठठल मत्ते याचा मातीत दबुन मृत्यु झाल्याबाबत त्याचे वडील श्री विठठल लक्ष्मण मत्ते यांनी पोस्टे माजरी येथे तकार दिल्याने अपराध क्रमांक 69 / 2023 कलम 304, 34 भादंवि प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयातील आरोपी विजय रामदास मत्ते आणि मंगेश रामचंद्र उपरे यांना अटक करण्यात आली असुन पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक श्री अजित देवरे, ठाणेदार पो.स्टे. माजरी हे करीत आहेत.