पोलीस मुख्यालय चंद्रपूर २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

पोलीस मुख्यालय चंद्रपूर २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

“मन चिंती ते वैरी न चिंती”, “योग साधनेने चित्तवृत्तीचा विरोध करता येतो’

जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांनी संयुक्तपणे जगातील सर्वांसाठी योग आणि ध्यान या संबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठी 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला आहे.

योग ही भारतीयांनी सर्व जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. योगशास्त्र हे भारतीय पारंपरिक प्राचीन शास्त्र आहे. योगाभ्यासानेच आपले आरोग्य संतुलित राहते. योगाभ्यास हा शारीरिक, मानसिक आणि बौध्दिक व्यायाम आहे. योगाभ्यासाने मनाची एकाग्रता वाढते, बुध्दिमत्ता वाढते व कार्यक्षमताची वाढते. व्यक्तीचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होते.

यास्तव आज दिनांक 21 जून निमित्त पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिह परदेशी यांनी पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे जिल्हयातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे करीता “आंतरराष्ट्रीय योग दिन” चे अनुषंगाने योग शिबीराचे आयोजन केले.

पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे आज दिनांक 21 जून, 2023 रोजी सकाळी 06:00 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला असुन सदर योग शिबीरात पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपअधिक्षक (गृह) सौ. राधीका फडके, पोलीस निरीक्षक श्री शिवाजी कदम, श्री बबन पुसाटे, सपोनि श्री मिलींद पारडकर, श्री राहुल चव्हाण सह विविध शाखा प्रमुख पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार असे एकुण 235 महिला सहभाग घेतला आहे. – पुरुष अधिकारी व अंमलदारांनी

पोलीस मुख्यालय चंद्रपूर 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी महिला पतंजली चंद्रपूर चे राज्य कार्यकारिणी सदस्या सुश्री स्मिता रेभनकर, श्री राजकुमार पाठक आणि सुश्री शारदा डाखरे यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकडुन योगाभ्यास करवुन घेतला आहे.