भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचेसन 2022-23 या वर्षातील अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचेसन 2022-23 या वर्षातील अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ

गडचिरोली,दि.21:भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचे सन 2022-23 मधील अर्ज दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत क्षेत्रीय स्तरावर स्विकारण्यात आलेले आहे. तथापि, क्षेत्रिय कार्यालये, विविध संघटना, पालक, विद्यार्थी यांचेमार्फत विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारण्याबाबत करण्यात आलेली विनंती विचारात घेऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभापासून गरजू विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी सदर योजनेअंतर्गत सन 2022-23 मधील विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारण्याची मुदत आता दिनांक 14 जुलै 2023 पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.