22 आणि 23 जून रोजी राज्य मागासवर्ग आयोग चंद्रपूर जिल्ह्यात

22 आणि 23 जून रोजी राज्य मागासवर्ग आयोग चंद्रपूर जिल्ह्यात

 

चंद्रपूर, दि. 21 : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. आनंद निरगुडे (निवृत्त) व इतर सदस्य 22 आणि 23 जून रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दि. 22 जून रोजी सकाळी 10 वाजता वडसा (जि.) गडचिरोली येथून ब्रम्हपुरी येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता नागभीड / सिंदेवाही / मूल येथे भेट व पाहणी. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम.

 

दि. 23 जून रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष यांच्याशी विविध विषयांवर चर्चा, सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनसुनावणी घेतील.