जिल्हा अग्रणी बँकेद्वारा रोजगार हमी कामावर प्रधानमंत्री सामाजिक सुरक्षा योजनेकरिता मेळावा

जिल्हा अग्रणी बँकेद्वारा रोजगार हमी कामावर प्रधानमंत्री सामाजिक सुरक्षा योजनेकरिता मेळावा

 

भंडारा, दि. 21 : सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (PMSBY) व प्रधानमंत्री जीवन ज्योति बिमा योजना (PMJJBY) पूर्तीकरिता 30 जून पर्यत प्रत्येक ग्राम पंचायतीमधे कॅम्प घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले आहेत.

 

जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडियाद्वारे मोहाडी तालुक्यातील सिरसोली गावात काम सुरू असलेल्या ठिकाणी 19 जून रोजी कॅम्प घेण्यात आला. यावेळी जिल्हा अग्रणी प्रबंधक गणेश तईकर यांनी कामाची रक्कम खात्यावर जमा होण्यास येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या व त्यावर उपाय सुद्धा सुचविले. तसेच सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल असे आश्वासन दिले. वित्तीय साक्षरता अधिकारी आर. एम. चोपकर यांनी सुरक्षा बिमा योजना (PMSBY), प्रधानमंत्री जीवन ज्योति बिमा योजना (PMJJBY) व अटल पेंशन योजना (APY) बाबत विस्तृत माहिती यावेळी मजुरांना दिली.