महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या – जिल्हा व्यवस्थापकाचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या – जिल्हा व्यवस्थापकाचे आवाहन

 

भंडारा, दि. 16 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाव्दारे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी अनुदान योजना,बीजभांडवल योजना व प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात.या योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्याना कर्ज देण्यात येते.महामंडळाच्या मार्फत अत्यल्प व्याजदरावर अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.

 

शासनामार्फत सातत्याने लाभार्थ्यापर्यत शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून अनेक सेवा देण्यात येत आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच जिल्हयात कार्यरत सर्व महामंडळाची आढावा बैठक घेण्यात आली.त्यात या वर्षात महामंडळाने उददीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

सन 2023-2024 या आर्थिक वर्षात विविध योजनांचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यानी

 

महामंडळ कार्यालयाशी 07184-252709 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री.एस.जे.खोब्रागडे यांनी केले आहे.