मनपाची मान्सुनपुर्व नाले स्वच्छता मोहीमे सातत्याने सुरु  

मनपाची मान्सुनपुर्व नाले स्वच्छता मोहीमे सातत्याने सुरु  

 

चंद्रपूर ७ जून – अवघ्या काही दिवसातच पावसाळ्याला सुरवात होणार असुन चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता अभियान अंतिम टप्यात आहे. सदर मोहीमेची स्वच्छता विभाग प्रमुख डॉ. अमोल शेळके यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली व स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंत्राटदारानी वेळेत काम संपविण्याच्या तसेच वेळप्रसंगी अतिरिक्त मशीन लावुन काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

महापालिका आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनानुसार यावर्षी पावसाळापूर्व गटार सफाई कामे लवकरच एप्रिल महिन्यापासुन सुरु करण्यात आलेली आहेत. सफाई मोहिमेवर अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील व उपायुक्त अशोक गराटे लक्ष ठेवून असुन ८८ सफाई कर्मचारी, ३ जेसीबी, २ पोकलेन, गाळ वाहतुकीसाठी ५ ट्रॅक्टरद्वारे नैसर्गिक मोठ्या नाल्यांच्या साफसफाईची कामे तसेच बंदिस्त गटारे साफसफाईची कामे करण्यात येत आहेत.

नाले स्वच्छता अभियानाअंतर्गत नाल्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरिता सुरळीत प्रवाह करण्यात येत असुन याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नाल्यांच्या काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल. शहरातील मोठ्या नाल्यांची तसेच लहान नाल्यांची साफ सफाई सुरू असून, मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. तसेच नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जातआहे.