स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत तहसिल कार्यालय पवनी येथे रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबीर

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत तहसिल कार्यालय

पवनी येथे रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबीर

भंडारा, दि. 10 : तहसिल कार्यालय पवनी येथे आझादी का अमृतमहोत्सव प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज तहसिल कार्यालयाच्या इमारतीमध्ये स्वैछिक रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन तहसिलदार निलीमा रंगारी यांच्या हस्ते करण्यात आले. निलीमा रंगारी तहसिलदार आणि मयूर चौधरी नायब तहसिलदार यांनी स्वतः रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांनी रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. रक्तदान करणाऱ्या मुक्तेश्वर निमजे, रंजीत सव्वालाखे, रूपेश बोंगिरवार, कृष्णा कूथे, योगिराज मेश्राम, गिरिष मांढरे, रेहान सय्यद यांना याप्रसंगी तिरंगा ध्वज, प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी समर्पण ब्लड बँकेची टिम डॉ. बोरकर, संदीप साखरवाडे, अभिषेक गिर्हेपुंजे, पल्लवी गिरोनकर आणि संचालक श्री. नखाते यांचे सहकार्य लाभले.