बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे.  – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे.

 – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

 

भंडारा, दि. 30 मे, : शेतकरी खरीप हंगामाची पूर्व तयारी करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बि-बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बँकांनी पीक कर्ज वेळेत द्यावे. खरीप पीक कर्ज वाटपाबाबत बँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.

 

बँक अधिकाऱ्यांची खरीप पीक कर्ज वाटपाबबात आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश तईकर यांच्यासह विविध बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांना पीक कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी आरबीआयच्या निर्देशानुसार पीक कर्ज वाटप केले पाहिजे. जिल्हास्तरीय बँक अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त असणाऱ्या इतर शाखेतून पीक कर्ज कमी वाटप होत असल्यास त्यावर बारकाईने लक्ष द्यावे. तसेच कर्ज वाटपाचा नियमित आढावा घ्यावा. विहित कालमर्यादेत पीक कर्ज प्राधान्याने वाटप करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी यावेळी दिल्या.