जिल्हा प्राणिक्लेष समितीची सभा संपन्न अशासकीय सदस्यांची नेमणुक करा- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

जिल्हा प्राणिक्लेष समितीची सभा संपन्न अशासकीय सदस्यांची नेमणुक करा- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

 

भंडारा, दि. 25 मे : जिल्हा प्राणिक्लेष समितीचा मुख्य उद्देश प्राणि रक्षण आहे. यावर प्राणि रक्षणात कार्यरत अशासकीय संस्था व त्यांच्या प्रतिनिधींचा शासन निर्णयानुसार अशासकीय सदस्यांची नेमणुक करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज दिले.

 

या बैठकीला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.एस.वंजारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुबोध नंदागवळी, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती वाघ, परिवहन कार्यालय निरीक्षक श्री. जगताप यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

 

पुढिल बैठक 15 दिवसांच्या आत लावून त्यामध्ये विषय तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी दिले. गेल्या बैठकीच्या ईतीवृत्तावर यावेळी चर्चा झाली.