मुलचेरा तालुक्यात स्त्रीशक्ती समाधान शिबीराचे आयोजन

मुलचेरा तालुक्यात स्त्रीशक्ती समाधान शिबीराचे आयोजन

गडचिरोली, दि.19: समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टिने महिलांच्या तक्रारी/समस्या शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर” आयोजीत करायचे आहे. तसेच विविध विभागांतर्गत राबविण्यात येणा-या योजनांचे स्टॉल लावुन प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार असून समस्याग्रस्त महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे.

दिनांक 24 मे 2023 रोजी सकाळी 10.00 वा. पंचायत समिती सभागृह, मुलचेरा येथे “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर” आयोजित केलेले आहे. तरी समास्याग्रस्त महिलांनी लेखी तक्रारीसह उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार, मुलचेरा यांनी केले आहे.