मांग व मातंग लाभार्थ्यां करिता थेट कर्ज योजने करिता उद्दिष्ट प्राप्त

मांग व मातंग लाभार्थ्यां करिता थेट कर्ज योजने करिता उद्दिष्ट प्राप्त

 

भंडारा, दि. 18 मे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय भंडारा अंतर्गत अनुदान / बीजभांडवल व थेट कर्ज योजने अंतर्गत अनुसूचित जातीतील मांग/मातंग व या समाजातील बारा पोट जातीतील लाभार्थ्यां करिता उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

 

इच्छुक लाभार्थ्यांनी जिल्हा कार्यालय भंडारा येथे प्रत्यक्ष येऊन अर्ज सादर करावे लाभार्थ्याशिवाय इतर व्यक्ती कडून अर्ज स्वीकारण्यात येणार नाही, महामंडळास अनुदान योजनेचे भौतिक उद्दिष्ट 30 तसेच बीजभांडवल योजनेचे 30 व थेट कर्ज योजनेचे 30 प्राप्त उद्दिष्ट च्या अधीन राहून कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात येईल. अधिक माहिती करिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संपर्क साधावा.