माजी सैनिक, विधवा व अवलंबितांची निवृत्तीवेतन समस्या सोडविण्यासाठी डीपीडीओ सिकंदराबाद येथील विशेष टीमचे आगमन.

माजी सैनिक, विधवा व अवलंबितांची निवृत्तीवेतन समस्या सोडविण्यासाठी डीपीडीओ सिकंदराबाद येथील विशेष टीमचे आगमन

माजी सैनिक, विधवा पत्नी व अवलंबित पेन्शनर यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 23: जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व पेन्शनधारक अवलंबित यांच्या निवृत्तीवेतन विषयी समस्यांचे निवारण, स्पर्श, पीसीडीए संबंधी आणि अडचणीची समस्या सोडविण्याकरीता दि. 24 व 25 एप्रिल 2023 रोजी, सकाळी 10 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, चंद्रपूर येथे डीपीडीओ सिकंदराबाद येथील विशेष टीम येणार आहे.

 

तरी, जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी व अवलंबित पेन्शनर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा. अधिक माहितीकरीता 07172-257698 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे (निवृत्त) यांनी केले आहे.