कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 च्या…

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 च्या

अमंलबजावणी करिता एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

ग्रामीण व अतिसंवेदनशिल भागात महिलांच्या कायद्याविषयक कार्यशाळेचे आयोजन

जिल्हाधिकारी संजय मिना याच्या हस्ते उद्धघाटन

गडचिरोली, दि.13: दिनांक 11 एप्रिल 2023 रोज मंगळवारला महिला व बालविकास कार्यालय गडचिरोली व्दारा आयोजित एक दिवसीय कौटुंबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण अधिनियम- 2005 या कायद्याची संपुर्ण देशभरात दिनांक 26 ऑक्टोबर 2006 पासून अमलात आला. त्याअंतर्गत कायद्याची जाणीवजागृती व कायद्याची अमंलबजावणी करण्याच्या उददेशाने सदर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन जायका रेस्टॉरेंट, लँडमार्क हॉटेल, गडचिरोली येथे करण्यात आले होते. सदर एकदिवशीय कार्यशाळेचे उद्धघाटन जिल्हाधिकारी संजय मिना यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. तसेच प्रमुख अतिथी म्हणून आर. आर. पाटील, सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली, श्रीमती. ज्योती जयराम मेश्राम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त व प्रकाश भांदककर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गडचिरोली हे उपस्थित होते.

प्रास्ताविक भाषणात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कौटुंबिक विरोधी कायदयाचा परिचय, कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय, याविषय माहिती दिली. गडचिरोली जिल्हयातील महिलांसंदर्भात संपूर्ण योजनांची माहिती पुस्तीका तसेच वनस्टॉप सेंटर प्रचार प्रसिद्धी पत्रकाचे विमोचन जिल्हाधिकारी संजय मिना यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर एक दिवसीय कार्यशाळेत कौटुंबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत स्टेकहोल्डर्स हे प्रत्येक पोलिस स्टेशन अंतर्गत महिला व बालकांवर काम करणारे पोलिस उपनिरिक्षक व सहायक पोलिस निरिक्षक तसेच महिला पोलिस अधिकारी, सर्व तालुका संरक्षण अधिकारी, पोलिस स्टेशन मधील समुपदेशक केद्रांचे सर्व समुपदेशक कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मधील कार्य करणारे विधी सेवा प्राधिकरणमध्ये पॅनल मधील वकील तसेच समाजात महिलांविषय काम करणारे समाजकार्येकर्त्ये व वनस्टॉप सेंटर मधील कर्मचारी यांचे करिता सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकुण चार सत्र घेण्यात आलेत यामध्ये पहिल्या सत्रात मार्गदर्शक म्हणून रूपाली काळे संरक्षण अधिकारी, गडचिरोली यांनी कौटुंबिक हिंचारापासुन महिलांचे संरक्षण कायदा 2005 नियम 2005 अंतर्गत संरक्षण अधिकारी यांची भुमीका याविषय मार्गदर्शन केले. तसचे दुसऱ्या सत्रात आर. आर. पाटील, सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी कौटुंबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण कायदा 2005 सेवापुरवणारे यांची भुमीका याविषयी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात सोरते मॅडम 3 रे सहदिवाणी न्यायाधिश, गडचिरोली यांनी कौटुंबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण कायदा 2005 अंतर्गत आदेशाची अमंलबजावणी अडचणी व सेवा पुरवणे यांची मदत यासंदर्भात मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात सारिका वंजारी विधी सल्लागार अधिकारी व रूपाली काळे संरक्षण अधिकारी यांनी चर्चासत्र व प्रश्नोत्तर याविषयक संवाद साधला. कार्यशाळेला विशेष उपस्थिती श्रीमती वर्षा मनवर अध्यक्ष बाल कल्याण समीती गडचिरोली, व श्रीमती सविता सादमवार समाजकार्येकर्ती, गडचिरोली, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील, परिविक्षा अधिकारी विलास ढोरे, बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यशाळेचे संचालन ओमकार नेवारे, संरक्षण अधिकारी कनिष्ठ आणी आभार प्रदर्शन वैशाली बांबोळे, समुपदेशिका यांनी मानले. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.