डॉ. आंबेडकर महाविद्यालयात व्यसनमुक्तीपर कार्यशाळा Ø सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आवाहन

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात व्यसनमुक्तीपर कार्यशाळा

Ø सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 12 : समाजात व्यसनाचे प्रमाण मोठया प्रमाणात जडलेले आहे. अशावेळी युवकांनी व्यसनापासून दुर राहून आनंदाने जगण्याचा मार्ग स्वीकारावा याकरीता सामाजिक न्याय पर्वाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती कार्यशाळेचे आयोजन डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आले.

 

समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अभिनव संकल्पनेतून संपुर्ण जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत सहायक आयुक्त, समाजकल्याण चंद्रपूर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने दि. 1 एप्रिल ते 1 मे 2023 हा संपूर्ण एक महिना सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमाने साजरा करण्यात येत आहे.

 

डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्यसनमुक्तीपर कार्यशाळेतील कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बेले, प्रमुख मार्गदर्शक डॉ. किरण देशपांडे, डॉ.समता मडावी तसेच स्वीकार या नशामुक्ती केंद्राचे संचालक तुलसीदास शहारे, समाजकल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण निरीक्षक मनिषा तन्नीरवार तर संचालन अनिकेत दुर्गे यांनी केले.