आकाशवाणीवर प्रवास टसर रेशीम कोषाचा यावर कार्यक्रम

आकाशवाणीवर प्रवास टसर रेशीम कोषाचा यावर कार्यक्रम

 

भंडारा दि.11 : हातमाग सप्ताहाच्या निमित्ताने “प्रवास टसर रेशीम कोषाचा” या विषयावर बुधवार दि.१२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८.४० वाजता नागपूर आकाशवाणी केंद्राव्दारे भंडारा जिल्ह्यातील टसर रेशीम उद्योग बाबत कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर 585 किलो हर्ट्झ वर तसेच NewsOnAir या ॲप वर देखील ऐकता येईल.

 

या कार्यक्रमामध्ये रेशीम विकास अधिकारी अनिलकुमार ढोले, वैज्ञानिक अंडीपुंज निर्मिती केंद्र, सी एस बी दवडीपार डॉ प्रविण गेडाम, प्रभारी केंद्रीय रेशीम अनुसंधान केंद्र अंबाडी श्री. सावरकर तसेच टसर कोष उत्पादन व अंडीपुंज उत्पादक लाभार्थी चंद्रकांत डहारे निष्टी, टसर धागा कताई कामगार मनोरमा गणविर जमनी, टसर साडी व कापड विणकर मोरेश्वर सोनकुसरे, तुती रेशीम शेतकरी इंदर बडवाईक सातोना, रेशीम ए आर एम धारक व टसर कापड उत्पादक रामकृष्ण सोनकुसरे भंडारा सिल्क उद्योग मोहाडी यांच्या मुलाखती प्रसारीत करण्यात येणार आहे. कार्यक्रमामध्ये टसर कोष ते कापड निर्मिती तसेच तुती रेशीम उद्योग बाबत माहिती देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा कार्यक्रम ऐकावा असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालयाने केले आहे.