हरवलेली महिला आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन

हरवलेली महिला आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 10 : रूपाली प्रकाश सोनपिपरे वय 31 वर्ष ही महिला दि. 16 मार्च 2023 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता घरून निघून गेली. तसेच रूपाली प्रकाश सोनपिपरे या महिलेचा तिच्या नातेवाईकाकडे तसेच चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन परिसरात जसे, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, जटपुरा गेट, वरोरा नाका, सामान्य रुग्णालय, पंचशील चौक, रामाळा तलाव, महाकाली कॉलरी, अष्टभुजा बायपास रोड, लालपेठ, बाबूपेठ, मूल रोड, बंगाली कॅम्प, देहात बिट परिसरात व इतरत्र शोध घेतला असता ती आढळून आली नाही.

 

हरविलेल्या महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे :

 

वय 31 वर्ष, रंग गोरा, उंची 5 फूट 2 इंच, चेहरा लांबट, सडपातळ बांधा, कानात पिवळ्या धातूच्या बाऱ्या, अंगात जामुनी कलरची टी-शर्ट व निळ्या रंगाचा जीन्स परिधान केलेला आहे. सदर वर्णनाची महिला आढळून आल्यास माहिती देण्याचे आवाहन शहर पोलिस स्टेशन, चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.