जीवनातील उदिष्ट व दिशा ठरविण्यासाठी युवकांनी विविध व्यासपीठाचा उपयोग करावा- जिल्हाधिकारी भंडारा

जीवनातील उदिष्ट व दिशा ठरविण्यासाठी युवकांनी विविध व्यासपीठाचा उपयोग करावा- जिल्हाधिकारी भंडारा

 

भंडारा, दि.20 : नेहरू युवा केंद्र तर्फे G20 या विषयावर दिनांक 16 मार्च 2023 रोजी जे. एम. पटेल कॉलेज भंडारा येथे जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विविध विषयावर संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी, प्रफुल्ल बांडेबुचे, नॅशनल ट्रेनर नुरचंद पाखमोडे, जे. एम. पटेल कॉलेज प्राचार्य डॉ. विकास ढोमने व डॉ. कार्तिक पनिकर उपस्थित होते.

 

अश्या व्यासपीठाचा उपयोग जीवनातील उदिष्ट ठरविण्यासाठी करावा. अश्या व्यासपीठावर विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्त्वाद्वारे मार्गदर्शन होत असते असे जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर म्हणाले. जिल्हा पोलिस अधिक्षक लोहित मतानी यांनी G20 या विषयावर विचार व्यक्त केले.

 

जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते अनिल महल्ले, नुरचंद पाखमोडे, डॉ. राजेंद्र शाह यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरू युवा केंद्र भंडारा चे जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य यांनी केले तर संचालन भोजराज श्रीरामे यांनी केले. प्राध्यापक प्रशांत वालदे यांनी आभार व्यक्त केले. जे. एम. पटेल महाविद्यालय नी महत्त्वपूर्ण योगदान दिले.