बस च्या नियोजित वेळेसाठी मोटेगाव,महादवाडी, केवाडा, पेढरी, काजळसर, खुटाळा, येथील संतापलेल्या विद्यार्थ्यांचे बस रोको रस्ता रोको आंदोलन.

बस च्या नियोजित वेळेसाठी मोटेगाव,महादवाडी, केवाडा, पेढरी, काजळसर, खुटाळा, येथील संतापलेल्या विद्यार्थ्यांचे बस रोको रस्ता रोको आंदोलन.

चक्क दोन ते तीन तास एसटी बस वाहतूक ठप्प

अखेर, चिमूर विधानसभा क्षेत्राचे,
आमदार, किर्तिकुमार (बंटी) भांगडिया,
यांनी बस वेळेवर सुरळीत येईल,असे फोन वरून दिलेल्या आश्वासनाने सुटले विद्यार्थ्यांचे रास्ता रोको आंदोलन…

चिमूर/नेरी

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा काॅलेज बंद आहेत मात्र गेल्या काही महिन्यापासून चालु झाले आहेत. त्या अनुशंगाने गाव खेड्यातील विद्यार्थी हे नियमीत काॅलेजला जायचे मात्र त्यांना काॅलेजला जातांना दररोज एसटी बस एक तास तर कधी अर्धा तास ऊशीरा यायची मात्र नियमीत वेळेवर आली की पॅसेंजर भरुन यायची त्यामुळे एका गावचे विद्यार्थी जायचे तर दुसर्या गावच्या विद्यार्थिना बसमध्ये जागा न मिळाल्याने त्यांना नाईलाजास्तव घरीच राहाव लागत. असा दररोज चिमूर- सीन्देवाही एसटी बस जाणार्या गावखेड्यातील विद्यार्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मोठेगाव पेंढरी संतापलेल्या विद्यार्थांनी आज दि, 28 सप्टेंबर रोजी पेंढरी (कोके,) येथे ११:वाजताच्या दरम्यान चिमुर सीन्देवाही एसटी बस च्या पुढे अचानक सर्व विद्यार्थी बसुन रास्ता रोकुन चक्क दोन ते तीन तास ट्रॅफिक जाम केली. व जवळपास पाच ते सहा एसटी बसेस रोकल्या सीन्देवाही पोलीसांना माहिती कळताच पोलिस, पि,एस, आय, नेरकर हे आपली टीम घेऊन घटस्थळी पोहचले. विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आगार प्रमुख चिमूर यांना दुरध्वनी द्वारे माहिती दीली. एक तासानंतर आगार प्रमुख शेख व त्यांची टीम हे पेंढरी येथे पोहचुन विद्यार्थ्यांसोबत पोलीसांच्या मध्यस्थीने तुमच्या मागण्या पूर्ण होईल व उद्यापासून नियमीत तुमच्या वेळेवर एसटी बस येईल असे तोंडी आश्वासन दिले,विद्यार्थांनी आगार प्रमुख यांना निवेदन दीले.त्यानंतर आंदोलन हे स्थगित करून रोकलेली ट्रॅफिक ही सुरळीत सुरू करण्यात आली. काही वेळाने आगार प्रमुख शेख हे गावकर्यांशी चर्चा करतांना बोलले कि, सकाळी सात पासुन एसटी बस चालु होतात विद्यार्थ्यांनी प्रत्येक बसमध्ये थोडे थोडे बसुन जायला पाहिजे.याबाबत पत्रकार यांनी आगार प्रमुख शेख यांना बाईट मागीतली असता शेख यांनी बाईट देन्यास नकार दिला. आता यापुढे विद्यार्थीसाठी नियमीत बस येईल का याकडे विद्यार्थी व गावकरी नागरीकांच लक्ष लागले आहे.
व सर्व विद्यार्थ्यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार, किर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांचे आभार मानले…