महाज्योतीतर्फे आज विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप टॅबने सोपा होणार अभ्यास

महाज्योतीतर्फे आज विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप टॅबने सोपा होणार अभ्यास

 

भंडारा, दि.17 : डिजिटल युगात अभ्यास देखील आता डिजिटल झाला आहे पुस्तकांसोबतच तो अधिक सोपा व्हावा यासाठी महा ज्योती तर्फे आज सामाजिक न्यायभवनामध्ये 893 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सुनील मेंढे, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित राहणार आहेत.

 

जेईई, निट या परिक्षाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 893 टॅबचे होणार आहे. त्या विद्यार्थ्यांना याबाबत कळविण्यात आले असून, उद्या त्याना टॅब वाटप होणार आहे. स्पर्धेच्या या डिजीटल युगात विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या मदतीने अभ्यासातील संदर्भ व इतर माहिती एका क्लिक वर उपलब्ध व्हावी यासाठी हे टॅब महत्वाचे ठरणार आहे. इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाचे महात्मा जोतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) JEE/NEET/MHT-CET चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब व डाटा सीमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात JEE / NEET/MHT-CET प्रशिक्षणाकरीता नोंदणीकृत विद्यार्थ्यांना 893 टॅब व डाटा सीम वाटपाकरीता प्राप्त असून टॅब व डाटा सीम वितरित होणार आहेत. जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेमार्फत टॅब व सीम मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यांना महाज्योती संस्थेमार्फत संदेशाव्दारे कळविण्यात आलेले आहे.

 

तरी विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी 10.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन, (जि.प.चौक जवळ) भंडारा येथे विद्यार्थ्यांनी आधारकार्ड/ ओळखपत्र, पालकाचे आधारकार्ड/ ओळखपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, 10 वी चे गुणपत्रक, बोनाफाईड प्रमाणपत्र (असल्यास) कागदपत्रांच्या स्वयंस्वाक्षांकीत प्रतीसह उपस्थित रहावे, असे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.