विभागीय हातमाग कापड स्पर्धा सन 2022-23

विभागीय हातमाग कापड स्पर्धा सन 2022-23

गडचिरोली, दि.10: सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन, यांचेमार्फत हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ठ हातमाग कापड नमुन्यांना प्रोत्साहन देऊन विणकरांना गौरविण्यासाठी हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यानुसार विभागीय हातमाग कापड स्पर्धा 2022-23 चे आयोजन विभागीय आयुक्त, नागपूर, विजयलक्ष्मी बिदरी यांचे अध्यक्षतेखाली दि.23 मार्च 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय आयुक्त (महसुल), नागपूर या कार्यालयाचे सभागृह जुने सचिवालय, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे करण्यात आले आहे. तरी अमरावती आणि नागपूर विभागातील सर्व जिल्ह्याचे हातमाग विणकरांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभाग नोंदविण्याकरीता हातमाग विणकरांनी तयार केलेले नमुने प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर या कार्यालयात दि.21 मार्च 2023 रोजी 2.00 वाजेपर्यत सादर करण्यात यावे. (पत्ता- प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपुर प्रशासकीय इमारत क्र.2, आठवा माळा, “बि” विंग, सिव्हिल लाईन्स, नागपूर) अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर यांचे कार्यालयास 0712-2537927 या क्रमांकावर संपर्क साधावा असे प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर तथा सदस्य सचिव, विभागीय हातमाग कापड स्पर्धा, सीमा पांडे यांनी कळविले आहे.