मराठी भाषेचे संवर्धन करणे गरजेचे- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर

मराठी भाषेचे संवर्धन करणे गरजेचे- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर

 

भंडारा दि. 28 : जिल्हा न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयूक्त विद्यमाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राजेश अस्मर यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा न्यायालय येथे ‘मराठी भाषा संवर्धन दिन’ साजरा करण्यात आला.

 

भाषेचे संवर्धन करणे गरजेचे असून मराठी भाषेला प्राचीन अशी संस्कृती लाभलेली आहे. विविध साहित्य मराठी भाषेत उपलब्ध आहे. मराठी भाषेचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने आपल्या व्यवहारात मराठी भाषेचा अभिमानाने जास्तीत जास्त वापर व्हायला पाहिजे. मराठी भाषेचे साहित्यांचे वाचन करण्याचे आवाहन श्री. अस्मर यांनी यावेळी त्यांनी केले. सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बिजु बा. गवारे यांनी प्रास्तावीकपर मार्गदर्शन केले.

 

‘मराठी भाषा संवर्धन दिन’ निमित्य प्रत्यक्ष तसेच आभासी पध्दतीने उपस्थित न्यायीक अधिकारी यांनी काव्य वाचन, चारोळ्या, कथा व लेख सादर केले. कार्यक्रमाचे संचालन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी श्रीमती एम.जी. हिंगणघाटे यांनी तर आभार अतिरिक्त सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी श्रीमती वैशाली व. वाघमारे यांनी केले.

 

मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्य श्री. अस्मर यांच्या संकल्पनेनुसार भंडारा जिल्हयातील सर्व न्यायाधीश वृंदांना मराठीत न्यायनिर्णय लिहण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार जिल्हा न्यायाधीश-2 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. एल. देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एन. यु. परमा, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर डी. पी. खंडेलवाल, 2 रे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती ए. पी. दिवान, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर (जलदगती न्यायालय) पी. पी. देशमुख, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी मोहाडी, बी. आर. पाटील, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी तुमसर एस. बी. गणपा यांनी प्रत्येकी एक तर 2 रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी तथा प्रभारी 3 रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी श्रीमती एम. जी. हिंगणघाटे यांनी पाच, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी लाखांदूर श्रीमती पी. एन. कोकाटे यांनी तीन व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी साकोली एन. पी. तलनीकर यांनी दोन असे एकूण 19 न्यायनिर्णय मराठी मध्ये लिहुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संकल्पनेस उत्तम प्रतिसाद दिला.

 

याशिवाय न्यायाधीश कौटूंबिक न्यायालय पी. एल. पालसिंगणकर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी तुमसर एस. बी. गणपा, श्रीमती एम. 2 रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी जी. हिंगणघाटे व सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी साकोली एस. आर. जैन यांनी न्यायालयाची कामकाजात विशेषत: न्यायनिर्णय लिहीतांना मराठी भाषेचा उल्लेखनीय वापर केल्याबद्दल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राजेश अस्मर यांचे शुभहस्ते गौरविण्यात आले.

 

कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. खुणे, जिल्हा न्यायाधीश-2 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. एल. देशपांडे, अतिरीक्त सह जिल्हा न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश पी. बी. तिजारे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एन. यु. परमा, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर डी. पी. खंडेलवाल, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर (जलदगती न्यायालय) पी. पी. देशमुख तसेच आभासी पध्दतीने 2 रे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती ए. पी. दिवान तसेच भंडारा जिल्हयाच्या तालुक्यातील सर्व न्यायाधीशवृंद आभासी पध्दतीने उपस्थित होते.