उपविभाग – भंडारा शांतता कमेटी / जातीय सलोखा समीती सदस्य मिटींग

उपविभाग – भंडारा शांतता कमेटी / जातीय सलोखा समीती सदस्य मिटींग

भंडारा:- भंडारा उपविभाग येथे शांतता समिती बैठक घेण्यात आली. सप्टेंबर महिणा हा सणाचा महिणा आहे. येणारे सण उत्सव श्रीकृष्ण जन्मास्टमी, दहीहांडी, पोळा गणपती, ईद- ई मिलाद सना निमीत्त जिल्हा पोलीस मुख्यालय येथील बहुउद्देशीय मिटींग सभागृह येथे दि. ०६/०९/२०२३ रोजी उपविभाग- भंडारा शांतता कमेटी / जातीय सलोखा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. शांतता समिती बैठक घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात पुष्पगुच्छ देवुन स्वागत समारंभानी केली. यावेळी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा श्री. लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधीकारी डॉ. अशोक बागुल तसेच धर्मदाय आयुक्त, एसडीएम, नगर परिषद भंडारा, पत्रकार बंधु, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थितीत होते.

कार्यक्रमाची सुरवात उपविभागीय पोलीस अधीकारी डॉ. अशोक बागुल यांच्या प्रास्ताविकपर भाषणानी झाली. त्यांनी शांतता समिती मिटींग घेण्याचा उद्देश म्हणजे आगामी काळात होणारे सण उत्सव साजरे होतात ते शांतते पार पाडावे. ईद ए मिलाद व गणपती विसर्जन एकाच वेळी येत आहे. त्या मिरवणुका शांततेत पार पाडावे. तसेच गणपती उत्सव एकाच ठिकाणी परमिशन मिळण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी यांनी पोलीस स्टेशनमध्ये एक खिड़की योजनेचे आयोजन करण्यात आले. डि. जे वाजविणा-यानी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश निर्गमीत करावे. जातीय सलोखाच्या बैठकीचा उद्देश आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून सांगितले.

अपर पोलीस अधीक्षक यांनी प्रास्तावीकपर बोलतांना गणपती उत्सव, येणारे सण उत्सव एकत्र येत आहे. गणपती विसर्जन व ईद ए मिलाद एकत्र आल्याने प्रशासनाकडून आपण काय करु शकतो. शांतता समिती सदस्यांना सुचना दिल्या. डि. जे. वापर तांना डेसीबल किती राहीला पाहीजे. पारंपारीक वादयाचा वापर केले तर नाइज पोलुशन थांबविता येईल. गणपती मंडळानी दोन स्वयसेवक नेमावे. शासनाची आदर्श गणपती मंडळ योजना असल्याने त्याचा फायदा मंडळाने घ्यावा. समाजामध्ये काही अनुचित प्रकार घडनार नाही. गणेश मंडळाचे पेंन्डाल हे रस्त्यावर राहणार नाही. जेणे करुन वाहतुकीस अडथळा निर्माण होईल..

समाजामध्ये काही अनुचित प्रकार घडनार नाही. गणेश मंडळाचे पेंन्डाल हे रस्त्यावर राहणार नाही. जेणे करुन वाहतुकीस अडथळा निर्माण होईल.

मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी यांनी गणपती उत्सवाकरीता एक खिडकी योजना राबविली आहे. त्यामध्ये सर्व डिर्पामेन्टचे एकाच वेळी परमिशन मिळणार आहे. तसेच भंडारा उपविभागात जातीय सलोखा अंबाधित रहावे. हया करीता समस्या उत्पन्न करणारे वर वेळेच प्रतिबंध कार्यवाही करण्यात येणार तसेच किमीनल दारू, जुगार, व शरीर विरुध्द गुन्हे करणारे लोकांनावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येईल. तसेच ईद ए- मिलाद व गणपती विसर्जन एकाच दिवशी आल्याने मिरवणुका हे ठरविलेल्या वेळेत करावयाचे आहे. जनावरे तस्करी करतात त्यांना तडीपार करणार, सोशल मिडीयावर आक्षेपार्य पोस्ट टाकल्यास पोलीस त्यांचेवर लगेच कारवाई करणार, तसचे आक्षेपार्ह पलक लावणे टाळावे. तसेच आक्षेपार्ह मुज्जीक टाळावे. आपल्या समोर कोणतीही अप्रिय घटना घडून आली. तर तात्काळ ११२ वर डायल माहिती घ्यावी. तसेच उपविभागीय प्रांतीय अधिकारी रविन्द्र राठोड तहसिलदार यांनी शांतता समिती सदस्य यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बैठकीमध्ये परवेज पटेल ईद ए मिलाद वगणपती विसर्जन एकाच दिवशी राहणार असल्याने त्यानी प्रशासनाय पुरा सहयोग करेगे असे बोलले. त्याचप्रमाणे यशवंत थोटे मोहाडी यांनी प्रास्तावीकपर सांगीतले.

यावेळी सर्व एसडीएम सर्व उपविभागीय अधिकारी भंडारा, पो.मु. भंडारा व पो.स्टे./ शाखेचे , पोलीस अधिकारी / कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, जातीय सलोखा समिती सदस्य, दक्षता समिती सदस्या, गणेश उत्सव मंडाळाचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधु व ईतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधीकारी डॉ. अशोक बागुल यांनी केले आहे.