व्यसनमुक्ती शिबीर तथा सामाजिक पथनाट्याने झाला मिनघरी क्रिडा महोत्सव २०२३ चा समारोप

व्यसनमुक्ती शिबीर तथा सामाजिक पथनाट्याने झाला

मिनघरी क्रिडा महोत्सव २०२३ चा समारोप

 आमचा गाव- आमचा विकास समिती मिनघरी चा उपक्रम

मिनघरी गुणगौरव सोहळा

निराधार वृध्द महिलांना साड्यांचे वितरण

 

११ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी पर्यंत आमचा गाव- आमचा विकास समिती मिनघरी, आयरन लेडी स्पोर्टिंग क्लब सिंदेवाही यांच्या वतिने मिनघरी येथे विविध क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते..११ फेब्रुवारी रोजी

तालुकास्तरीय अंडरआर्म मिश्र क्रिकेट स्पर्धा, गावस्तरीय व्हॉलीबाल, गोळाफेक स्पर्धा,

*१३ फेब्रुवारी पासून भव्य डे- नाईट कबड्डी स्पर्धा*

यामध्ये टाईगर के.सी. देलनवाडी प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला तर मिनघरी संघ द्वितीय व जय बजरंग किन्ही संघ तृतिय क्रमांकाचा मानकरी ठरला..

 

*शेवटचा समारोपीय कार्यक्रम १७ फेब्रुवारी ला पार पडला*

 

यामध्ये संत गजानन महाराज व्यसनमुक्ती केंद्र सिंदेवाही द्वारा आयोजित व्यसनमुक्ती शिबीर तथा सामाजिक पथनाट्याचे सादरिकरण करण्यात आले..

*आमचा गाव-आमचा विकास समिती मिनघरी*

यांच्या वतिने मिनघरी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मिनघरीतील विविध क्षेत्रात काम करणारया् गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.ट्रॉफि,शाल,श्रिफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा समितीने सत्कार केला. त्यानंतर गावातील वृध्द निराधार महिलांना समितीच्या वतिने भेटवस्तू म्हणुन साड्यांचे वितरण करुन त्यांच्या चेहरया्वर हास्य फुलविण्याचे काम या समितीने करत त्यांना आधार दिला. तरुण वर्गाने व्यसनाच्या आहारी न जाता त्याने आपले आयुष्य चांगल्या कामात लावावे हा व्यसनमुक्ती शिबीराचा उद्देश ठेवून गावातील प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षणासोबत विविध खेळातही तरबेज व्हावेत यासाठी या क्रिडा महोत्सवाचे पहिल्यांदाच मिनघरी गावामध्ये आयोजन केले होते. समारोपीय कार्यक्रमात उद्धाटक प्रा.डाॅ. कोर्तलवार सर ज्ञानेश महा.नवरगाव, अध्यक्ष प्राचार्य डॉ.डहारे सर सर्वेादय महा.सिंदेवाही,प्रा. मेश्राम सर नवरगाव, तामदेवजी बोरकर मिनघरी, महेंद्र खोब्रागडे शिक्षक नाचनभट्टी, पवन सोनवाने शिक्षक नवरगाव,इंजि प्रफुल रामटेके,वर्षाताई रामभाऊ बोरकर मिनघरी,मुर्लिधरजी मडावी माजी सदस्य पं.स. सिंदेवाही, रविभाऊ लेंझे मिनघरी यांच्या उपस्थित व्यसनमुक्ती शिबीर तथा सामाजिक पथनाट्याने कार्यक्रमाचा समारोप झाला.

या मिनघरी क्रिडा महोत्सवाच्या यशस्वितेसाठी विमीत दहिवले अध्यक्ष आमचा गाव-आमचा विकास समिती मिनघरी,प्रा.भारत मेश्राम शिक्षणतज्ञ पं.स.सिंदेवाही रामभाऊ बोरकर माजी सदस्य ग्रामपंचायत मिनघरी, लखन नन्नावरे सदस्य ग्रामपंचायत मिनघरी, आकाश गेडाम, रोमन चौधरी, हेमंत बन्सोड, प्रशांत गेडाम, लिखित गुरनुले, अंकित कावळे, स्वप्निल कोल्हे, राहूल चांदेकर, निश्चय बगडे, मनोज मामीडवार, अभिजित शेंडे आणि समस्त ग्रामवासिय मिनघरी यांच सहकार्य लाभले.आदर्श गावाची संकल्पना घेऊन आमचा गाव-आमचा विकास समिती तयार करुन गावातील युवक यासाठी मेहनत करत आहेत. आणि या सर्व माध्यमातून लवकरच हि समिती गावातील जनतेसाठी ऍम्बुलन्स आणणार आहे. हा संकल्प आणि नाविन्यपुर्ण उपक्रम समिती राबवित आहे..