धानाचे तणीस कुजवून त्याचा वापर शेतीमध्ये करावा डॉ. व्ही. जी. नागदेवते

धानाचे तणीस कुजवून त्याचा वापर शेतीमध्ये करावा डॉ. व्ही. जी. नागदेवते

 

कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपुर येथे दुसरी शेतकरी शास्त्रज्ञ मंच मासिक सभा दि.०९.०२ २०२३ रोजी आयोजीत करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. मच्छिंद्र घिगु रामटेके, प्रगतशील शेतकरी होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. व्ही. जी. नागदेवते, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही होते. सर्व शास्त्रज्ञ आणि शेतकरी शास्त्रज्ञ मंचा मधील शेतकरी सदस्य उपस्थित होते होते. डॉ. विजय. एन. सिडाम, विशेषज्ञ, कृषि विस्तार तथा सचिव, शेतकरी शास्त्रज्ञ मंच, कृवीके, सिंदेवाही यांनी सभेचे प्रास्ताविका मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ, अकोला येथुन प्रसारीत झालेल्या तंत्रज्ञानाचा, कृषि संवादिनी २०२२, कृषि दिनदर्शिका २०२३ आणि कृषिपत्रिका २०२३ या शेतीविषयक उपयुक्त प्रसारित मध्यम- तंत्रज्ञानाची माहिती देवून त्याचा प्रचार प्रसार करावा असे सुचविले. प्रमुख मार्गदर्शनामध्ये डॉ. व्हीं.जी.नागदेवते यांनी उन्हाळी हंगामातील तीळ आणि उन्हाळी भुईमुग या तेलबिया पिकाचे तसेच उन्हाळी मुंग या कडधान्य पिकांचे लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, धानाचे तणीस कुजवून त्याचा वापर शेतीमध्ये कश्या प्रकारे करावा याविषयी सखोल मार्गदर्शन केले. डॉ. एस. एन. लोखंडे यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया योजना आणि भरडधान्याचे पोषण आहारातील महत्व विशयी मार्गदर्शन केले.डॉ. वर्षा जगदाळे यांनी पशुखाद्यामध्ये अॅझोलाचा वापर, कुक्कुटपालन मध्ये सोनाली आणि कावेरी या जातींच्या व्यवस्थापना विषयी मार्गदर्शन केले. कु. स्नेहा वेलादी यांनी कृषी मध्ये यांत्रिकीकरणाचा वापर व कृषी अवजारा विषयी माहिती दिली. अध्यक्षीय मार्गदर्शनातून श्री मचिद्र रामटेके यांनी आपल्या गावातील रब्बी हंगामाची लागवड केलेल्या हरभरा पिकाचे पिकेही कांचन वाण, जवस एनएल -२६० वाण या पिकांच्या लागवडीचे आपले अनुभव वेक्त केले. २०२३ हे जगतिक भरडधान्य घोषीत करण्यात आले असून तानुषगाने या सभेमध्ये भरडधान्य लागवड तंत्रज्ञान आणि त्याचे आहारामधील महत्त्व या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथे डॉ. व्हीं.जी.नागदेवते आणि. श्री.मच्छिंद्र घिगु रामटेके यांचे हस्ते विक्री केंद्राचे (Sale Counter) उदघाटन करण्यात आले.