एम.पी.एस. सी च्या प्रशिक्षणासाठी प्रतीक्षायादीत 48 विद्यार्थ्यांची निवड महाज्योतीने घेतली विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल

एम.पी.एस. सी च्या प्रशिक्षणासाठी प्रतीक्षायादीत 48 विद्यार्थ्यांची निवड

 

महाज्योतीने घेतली विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल

 

भंडारा दि. 8 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील एकुण 15000 विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. यापैकी 48 जागा या रिक्त होत्या. सदर रिक्त जागा भरण्याकरिता विद्याथ्यांनी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांचेकडे मागणी केली होती.

 

महाज्योतीने विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घेऊन रिक्त जागा भरण्याकरिता गुणानुक्रमानुसार 48 पात्र उमेदवारांची निवड यादी संकेत स्थळावरती प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आनंदाची भावना असून, महाज्योतीने न्याय मिळवून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.