कवी महादेव ढोणे यांचा “डबल धडाका”

कवी महादेव ढोणे यांचा “डबल धडाका”

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथील “कवी कट्टा” व “गझल कट्टा” साठी निवड

राजुरा : दिनांक ३ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी २०२३ येथे विदर्भ साहित्य संघ शाखा यांच्या आयोजनात वर्धा येथे होणाऱ्या भव्य आणि भरगच्च अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कविकट्टा व गझल कट्टा या काव्यमंचासाठी एसटी महामंडळाच्या चंद्रपूर विभागात राजुरा डेपो येथे चालक म्हणून कार्यरत असलेले कवी श्री.महादेव मारोती ढोणे यांची निवड झाली आहे.ते दिनांक ५ फेब्रुवारीला दुपारी १२ ते १ या वेळेत कवी कट्ट्यावर आपली कविता सादर करणार आहेत.

 

कवी महादेव ढोणे यांनी अनेक राज्य स्तरीय कविसंमेलनात सहभाग नोंदवून चांगल्या दर्जेदार कविता सादर करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यांनी वेळोवेळी एसटी कामगारांच्या व्यथा,वेदना आपल्या लेखणीतून समाजासमोर मांडल्या तर आहेतच त्याच बरोबर इतर ही सामाजिक विषयाला हात घालून परखडपणे लिखाण केले आहे, करत आहेत.त्यांची निवड झाल्याचे अ. भा. साहित्य संमेलनाच्या आयोजन समिती,निवड समिती तर्फे फोन द्वारे, ईमेल द्वारे कळवले आहे.साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर एसटी महामंडळातील अधिकारी,कर्मचारी वर्ग तसेच मित्र परिवाराने त्यांच्या निवडीचे विशेष कौतुक केले आहे.