अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी दोन वाहनांवर कारवा

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी दोन वाहनांवर कारवा

चंद्रपूर दि. 20 ऑक्टोबर : जिल्हा भरारी पथकाने दि.19 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता रामनगर पोलीस स्टेशन, चंद्रपूर  येथे तसेच ईरई नदी पात्राजवळ दाताळा रोड, चंद्रपूर येथे अवैध रेती वाहतूक  करणाऱ्या दोन वाहनांवर जप्तीची कारवाई केली. सदर कारवाई अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
सदर वाहनाची तपासणी केली असता अवैध रेती वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाल्याने रामनगर पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथे मिथिलेश चन्ने यांच्या मालकीचे हॉपटन वाहन क्र. एमएच-34, एम-4363 व ईरई नदी पात्राजवळ दाताळा रोड, चंद्रपूर येथे वैभव सुनील होकम यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्र. एमएच-34, एपी-1654 या दोन्ही वाहनांची जप्ती करून हॉपटन वाहनावर रुपये 1 लक्ष 22 हजार 200 तर ट्रॅक्टरवर 1 लक्ष 5 हजार 260 याप्रमाणे दंड आकारण्यात आला असून वसुली कार्यवाही करण्यात येत आहे. असे अपर जिल्हाधिकारी विदयुत वरखेडकर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.