सर्व नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून निवडणुकीची कर्तव्य पार पाडावीत /निवडणुक निरीक्षक अरूण उन्हाळे यांनी घेतला आढावा                   

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून निवडणुकीची कर्तव्य पार पाडावीत /निवडणुक निरीक्षक अरूण उन्हाळे यांनी घेतला आढावा                   

 

भंडारा दि.23: शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्यांचे सुयोग्य वहन करावे.निवडणूक कालावधीत सतर्क राहून कर्तवय पार पाडणयाची सूचना शिक्षक मतदारसंघ निवडणूकीचे भंडारा जिल्हा निरीक्षक अरूण उन्हाळे यांनी आज दिल्यात.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूकीच्या संबंधीत सर्व अधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला.जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी निवडणूकीशी संबंधीत माहिती दिली.जिल्हयात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 3797 मतदार असुन 12 मतदान केंद्रे आहेत.यासाठी मनुष्यबळाची तरतुद करण्यात आली आहे.कायदा व सुव्यवस्थेच्या बाबत गृह विभागाने केलेल्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले.सर्वात जास्त मतदार संख्या भंडारा मतदान केंद्रावर तर सर्वात कमी धारगाव केंद्रावर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 30 जानेवारी सोमवारी सकाळी 8 ते 4 दरम्यान नाकाडोंगरी, तुमसर,मोहाडी, भंडारा, जवाहरनगर, धारगांव, साकोली, लाखनी, पालांदूर, अडयाळ, पवनी, लाखांदूर या 12 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून 4 फेब्रुवारीपर्यत निवडणूक प्रक्रीया पूर्ण करण्यात येईल. बैठकीला सर्व विषयांचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.