चंद्रपूर महानगरपालिकेत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

चंद्रपूर महानगरपालिकेत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

चंद्रपूर १ जुन – हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेत साजरी करण्यात आली. उपायुक्त अशोक गराटे तसेच मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक, प्रगतिशील शेतकरी, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जयंतीदिन संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. वसंतराव नाईक यांना राज्याच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ मानले जाते. याप्रसंगी विधी अधिकारी अनिल घुले, सारंग निर्मळे,विकास दानव,गुरुदास नवले,विलास बेले, माधवी दाणी, पुणेकर, मनोज सोनकुसरे,चॅनल वाकडे तसेच मनपा अधिकारी कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.