भंडारा | शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा

भंडारा | शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा

 

भंडारा दि 9: नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणूक 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान व मतमोजनी 2 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.

या निवडणूकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात यावी. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तक रजेव्यतिरिक्त असणार आहे, असे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (सा.प्र.) प्रदीप कुलकर्णी यांनी कळविले आहे.