भंडारा | प्रारुप मतदार यादी अवलोकनासाठी प्रसिध्द

भंडारा | प्रारुप मतदार यादी अवलोकनासाठी प्रसिध्द

 

भंडारा, दि. 6 : 1 जानेवारी 2023 अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. या अंतर्गत 9 नोव्हेंबर 2022 ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत प्राप्त झालेले दावे व हरकती निकालात काढून 60-तुमसर विधानसभा मतदार संघातील मोहाडी तालुक्यातील सर्व मतदान केंद्राचे ठिकाणी, तहसिल कार्यालयाचे ठिकाणी 5 जानेवारी 2023 रोजी अंतिम मतदार यादी सर्व जनतेच्या अवलोकनासाठी व उपयोगासाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करुन घ्यावी, असे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार मोहाडी यांनी कळविले आहे.