ओबीसी आयोगाचा अध्यक्ष म्हणून विद्यमान ओबीसी प्रवर्गातील जातींना कसलाही धक्का लागू देणार नाही – हंसराज अहीर

ओबीसी आयोगाचा अध्यक्ष म्हणून विद्यमान ओबीसी प्रवर्गातील जातींना कसलाही धक्का लागू देणार नाही. मागासवर्गीयांच्या आरक्षणात कसलीही कपात होऊ देणार नाही त्यांचे संरक्षण व प्रगती करिता मी आयोगाचा अध्यक्ष आहे. अन्य कोणत्याही जाती ओबीसी मध्ये घेण्याचा अधिकार मला नाही. असे मत प्रिंट मिडीया, इलेक्ट्रानिक मिडीया च्या पत्रकारांनी मराठा आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष मा. हंसराजभैय्या अहीर यांनी व्यक्त केले.